Mumbai news : सध्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका गुन्हेगाराने नागरिकांना शेअर मार्केट ट्रेडिंगची प्रक्रिया शिकवण्याचे खोटे सांगून त्यांच्याकडून पैशांची उकळण केली. यामध्ये एका महिलेची 27 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
या महिलेने अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मलबार हिल इथे सायबर क्राईम पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेला स्टॉक ट्रेडिंग शिकायचे होतं म्हणून त्यांनी एका व्यक्तीसोबत ऑनलाईन ट्रेडिंग केलं. त्यांनी सगळे तपशील आरोपी आदित्य अग्रवाल याला दिली.
त्यांना लगेच एका व्यक्तीचा कॉल आला. कॉलरने महिलेला सांगितले की, तो तिला यासाठी मार्गदर्शन करेल. त्याने महिलेला १०% नफा मिळविण्यासाठी एका विशिष्ट योजनेत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. यामुळे महिला त्याचे सगळं ऐकत गेली. यामुळे तिची फसवणूक झाली.
दरम्यान, गुंतवणुकीसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून त्याने तिला विविध बँक खाते क्रमांकही दिले. त्याने महिलेला तिच्या गुंतवणुकीवर १०% नफा देण्याचे आमिष दाखवले. मात्र तिला माहिती नव्हते की आपली फसवणूक होतेय. नंतर तिला पासवर्ड देखील देण्यात आला.
यानंतर तिचे लॉग इन झाले नाही. यामुळे तिला संशय आला. तिने विचारले असता नंबर बंद लागले. यानंतर आरोपींवर भारतीय दंड संहिता अंतर्गत फसवणूक आणि बनावटगिरी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ओळख चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आरोपींनी सर्व भारतीय बँक खाते क्रमांक दिले होते. तपासकर्ते आता बँक खात्यांचे तपशील आणि आरोपीच्या सिमकार्डचे तपशील गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.