पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेक लोक हे फिरायला निघतात. गडकिल्ले, धबधबे निसर्गाची हिरवळ पाहण्यासाठी लोक बाहेर पडत असतात. पण फिरायला जाणाऱ्या लोकांसोबत धक्कादायक घटना घडल्याचे प्रकारही समोर येत असतात.
असाच काहीसा प्रकार लोणावळ्यातून समोर आला आहे. एक मित्रमैत्रिणींचा ग्रुप मुंबईहून लोणावळ्यात आला होता. इथे ते फिरायला आले होते. पण यामध्ये दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाले आहे.
या तरुणांसोबत एक तरुणीसुद्धा पाण्यात बुडत होती. पण गावकऱ्यांच्या मदतीने तिला वाचवण्यात आलेले आहे. प्रियांक व्होरा (वय ३५), विजय यादव (वय ३५) असे या बुडून मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे.
प्रियांक, विजय आणि झेनिया या तिघांसह सहा जण लोणावळा फिरण्यासाठी आले होते. त्यामध्ये दोन तरुणी सुद्धा होत्या. लोणावळा फिरण्यासाठी त्यांनी राहण्याची सोय केली होती. त्यांनी वरसोली येथे एक बंगला भाड्याने घेतला होता.
फिरायला जायचंय म्हणून ते दगडाच्या खाणीकडे फिरायला गेले होते. यावेळी ते दगडाच्या खाणीत पाणी पाहून पोहण्याचा विचार करु लागले. त्यामुळे प्रियांक, विजय आणि झेनिया या तिघांनीही पाण्यात उडी देखील घेतली.
त्यानंतर ते थोडे बाजूला गेले. पण तिथे पाण्याची खोली जास्त होती. तिथे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा तिथेच पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तरुणीला तिच्या मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने वाचवले आहे. सध्या तरुणी सुखरुप आहे.
या घटनेची लोणावळा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी घटनेची पाहणी करत त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. पण त्याच्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला होता.