माझ्या बायकोने जेवढे किस घेतले नाहीत तेवढे किस ‘या’ लोकांनी घेतले; अजितदादांनी दिली कबुली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही दिवसांपूर्वी सरकारमध्ये गेले. यानंतर ते बारामतीत आले नव्हते. आता ते पहिल्यांदाच बारामतीत आले. यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सभेत त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. यामुळे सभेत खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. डीजेच्या तालावर बारामतीकर अक्षरशः नाचत होते. यामुळे शहरातील वातावरण बदलून गेले होते. यावेळी अजित पवार म्हणाले, बारामतीतील रस्त्यांनी एवढ्या फुलांच्या पाकळ्या कधीच पाहिल्या नव्हत्या.

परंतु इतकी ढकला-ढकली आणि रेटा-रेटी आयुष्यात मला कोणीच केली नाही, असा चिमटाही अजित पवारांनी काढला. रोड अक्षरशः भरून गेले होते. अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. मला इतक्या प्रकारच्या टोप्या घातल्या गेल्या. एक घातली की लगेच दुसरी, लगेच तिसरी.

त्यामुळे आता मला विचार करावा लागणार आहे, की किती वाजता उठून कामाला सुरुवात करायची आणि रात्री किती वाजता झोपायच. मला पहाटे उठून काम करायची सवय आहे. अनेकवेळा माझी बायको मला म्हणते, जरा दमाने घ्या. हे काय चाललंय? जरा वयाचा विचार करा.

परंतु कामातूनच खरं समाधान मिळत असते. काहीजण तर माझ्या हाताला किस करत होते, मुके घेतले. ‘मी म्हटले आयला बायकोने कधी एवढे किस घेतले नाही. हे काय चाललंय तरी काय आज, असे म्हणताच एकच हशा पिकला. यामुळे दादांनी या सभेत पूर्ण खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले होते.

दरम्यान, पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे प्रथमच बारामतीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मोठ्या जल्लोषात बारामतीकरांनी त्यांचे स्वागत केले. असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यामुळे बारामतीत दिवाळीच असल्याचे चित्र निर्माण झाले होते.