Nagpur crime : नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामातील चुका सुधारण्यास सांगिल्याने मिहानमधील हेक्सावेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे साहाय्यक व्यवस्थापक एल देवनाथन एन. आर. लक्ष्मीरसिम्हण यांची हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याबाबत बेलतरोडी पोलिसांनी गौरव भीमसिंग चंदेल व पवन अनिल गुप्ता ऊर्फ हलवाई या दोघांना अटक केली आहे. गौरव हा देवनाथ यांचा कनिष्ठ कर्मचारी आहे. रविवारी रात्री गौरव हा देवनाथन यांच्या फ्लॅटमध्ये आला होता. याठिकाणी ते दारू पिले. यावेळी काहीशी बाचाबाची झाली.
तू कामात निष्काळजीपणा करीत आहेत. तू चुका करत असून तुला त्या सुधाराव्या लागतील. चुका न सुधारल्यास तुझा कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील, असे देवनाथन गौरवला म्हणाले. यामुळे हा वाद पुढे वाढतच गेला.
त्यामुळे गौरव संतापला. त्याने चाकूने देवनाथन यांच्या छातीवर वार करून त्यांचा खून केला. यामुळे एकच खळबळ उडाली. दारूच्या नशेत हे कृत्य झाल्याचे समोर आले आहे. बेलतरोडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
गौरवने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देत खून केल्याचे मान्य केले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत पुढील तपास सुरू असून या घटनेने कंपनीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, दोघेही आरोपी पोलिस कोठडीत असून, पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहेत. या घटनेनंतर आरोपीनी पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.