सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या अनेक घटना समोर येत आहे. आता नागपूरमधून एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. वसतीगृहामध्ये स्थान करत असतानाच एकाने महिला डॉक्टरचा व्हिडिओ बनवल्याचे प्रकरण समोर आले होते.त्यानंतर आता तिथेच एका महिला डॉक्टरवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये एका महिला डॉक्टराचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न झाला होता. ही घटना समोर असतानाच आता मेडिकल कॉलेजमधून महिला डॉक्टरचे लैंगिक शोषण केल्याची आणखी एक तक्रार समोर आली आहे.
मनोविकृतीशास्त्र विभागाच्या एका महिला डॉक्टरने त्याच विभागाच्या एका वरिष्ठ डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे. डॉ. राज गजभिये यांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली असून त्यावर आता ते चौकशी करणार आहे.
या विभागात एक महिला डॉक्टर सहा महिन्यांच्या करारावर कार्यरत आहे. अशात महिला डॉक्टर मंगळवारी कार्यालयात पोहचली होती. त्यानंतर तिने तिच्याच वरिष्ठ डॉक्टरांविरोधात छळ केल्याची तोंडी तक्रार केली आहे.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिला लेखी तक्रार देण्यात सांगितले. मग तिने लेखी तक्रार दिली. लेखी तक्रार मिळताच गजभिये यांनी चार सदस्यीय समितीची नेमली आहे. आता ते याप्रकरणाची चौकशी करत आहे.
संबंधित वरिष्ठ डॉक्टर त्या महिला डॉक्टरचा छळ करत होते. विनाकारण त्यांना कॅबिनमध्ये बसवून ठेवले जात होते, असे त्या महिला डॉक्टरने सांगितले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक छळवणूकीच्या तक्रारी येत आहे.
काही दिवसांपूर्वीच वसतीगृहात एका महिला डॉक्टरचा अंघोळ करताना व्हिडिओ काढण्यात आला होता. याप्रकरणी डॉ. दर्शन अग्रवाल याला दोषी ठरवण्यात आले होते. सहा सदस्यांची एक समिती तयार करण्यात आली होती. त्यांनीही तपास करुन त्याला दोषी ठरवले होते.