Nagpur News : नागपूरमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. याठिकाणी क्षुल्लक वादातून सख्ख्या बहिणीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला गेला. याप्रकरणी भावाला यशोधरा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, संगिता ही पतीसह आईला भेटण्यासाठी आरोपीकडे गेली होती. ती आईची भेट घेऊन परत येत असताना आरोपीच्या सात वर्षीय मुलाने संगिताच्या पतीला ‘मला गाडी शिकवून द्याल का मामा?’ असे म्हटले.
तू अगोदर मोठा हो मोठा झाल्यावर तुला गाडी शिकवितो,’ असे उत्तर संगिताच्या पतीने या मुलाला दिले. यामुळे आरोपी भडकला. त्याने रागाच्या भरात बहिणीच्या पतीला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. हा वाद वाढत गेला.
या वादावर बहिणीने शिवीगाळ का करतोस म्हणून हटकले असता त्याने भांडण सुरू केले. संगिता भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपीने घरातून लोखंडी रॉड डोक्यावर मारून जखमी केले. यामुळे परिसरात खळबळ उडाली.
दरम्यान, आरोपीविरुध्द गुन्ह्याची नोंद करुन त्याला अटक केली आहे. संगितावर उपचार सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र अचानक आणि शुक्कल कारणावरून ही घटना घडली आहे. यामुळे चर्चा सुरू आहे.