---Advertisement---

Nagpur News : हत्या नागपुरात, मृतदेह मध्य प्रदेशात, घटनेने पोलिसही हैराण पण असा लावला छडा…

---Advertisement---

Nagpur News : नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरडा येथील बस स्टॉपवरील बाकावर सुमारास एका होमगार्डची हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली.

याबाबत आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हा मध्य प्रदेशात नेला. त्याठिकाणी एका रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर ठेवला. मात्र आरोपीचा पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न फसला. काही तासातच या हत्येचा उलगडा झाला आणि पोलिसांनी मध्य प्रदेशातून मृतदेह ताब्यात घेतला.

कुणाल नाईक, सुमित गजभिये आणि आशिष नगदिवे असे आरोपींची नावं आहे. आशिष दिलीप पाटील (२७, नवीन गोंदेगाव, पारशिवनी) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत कसून तपास केला. काही वेळातच याबाबत माहिती समोर आली आहे.

याबाबत पोलिसांना मध्यप्रदेशातील तिरोडी जिल्हा बालाघाट येथे एका कारमध्ये तरूणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर याला वेगळे वळण मिळाले.

बोरडा शिवारातील नवीन गोंदेगाव फाटा परिसरातील बस स्टॉपचा बाकावर आणि जमिनीवर नागरिकांना मोठ्या प्रमाणात रक्ताचे लोट पडलेले दिसले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. याठिकाणी पोलिसांना एक मोटारसायकल देखील आढळून आली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---