Nagpur news : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी कर्जबाजारी झाल्याने दंतचिकित्सकाने चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रामटेकेनगर येथील कुश अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे.
ते कर्जबाजारी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तणावात राहायचे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेल्या. घरी कोणी नसताना शनिवारी रात्री त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मित्र डॉ. योगेश हे त्यांच्या घरी आले. त्यांनी दार वाजवले.
असे असताना मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी जोराने दाराला धक्का दिला. यानंतर दरवाजा तुटला. यावेळी त्यांना समोरील दृष्य बघून धक्काच बसला. आशिष हे त्यांना गळफास घेतलेले दिसले. त्यांनी लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी पंचनामा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे नेला. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली. यामध्ये कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करीत असल्याची त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. आशिष गणपतराव मुलार (वय ३५) असे मृतकाचे नाव आहे. ते हुडकेश्वरमधील एका खासगी रुग्णालयात सेवा द्यायचे. याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, दंतचिकित्सकाने चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामटेकेनगर येथील कुश अपार्टमेंटमध्ये घडली. या घटनेमुळे कुटूंबाला एकच धक्का बसला.