नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुकानदाराची प्राध्यापिका असलेली मुलगी किराणा दुकानात माल पोहोचवणाऱ्या मालगाडी ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. दोघांनी घरच्यांचा विरोध असून देखील लग्न केले. नंतर मात्र तो तरुण एका भाजी विक्रेती महिलेच्या प्रेमात पडला.
यामुळे त्यांच्या नात्याला नजर लागली. यामुळे प्राध्यापिकेच्या संसारात अडचण निर्माण झाली होती. भरोसा सेलने तिच्या पती आणि ४५ वर्षीय भाजीविक्रेतीला समुपदेशन केले. नंतर प्राध्यापिकेचा संसाराला लागलेले विघ्न टळले. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, प्राध्यापिका तरुणी ही किराणा दुकान चालवणाऱ्या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आहे. तिचे वडील काही कामात व्यस्त असल्यास तरुणी दुकानात बसून अभ्यास करायची. यामध्ये तिची ओळख गाडीचालक संजयशी झाली. तो कमी शाळा शिकला होता.
असे असताना तरुणीचे संजयशी संपर्क वाढत गेला. दोघे एकमेकांशी बोलू लागले. पुढे दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले. ते एकमेकांना भेटू लागले. यामुळे त्यांच्यात जवळीक वाढू लागली.
पुढे तरूणीने नेट-सेट परीक्षा पास केली. ती कॉलेजमध्ये नोकरी करू लागली. तिने संजयसोबत लग्न करायचा निर्णय घेतला. मात्र, तिच्या आई, वडिलांनी याला विरोध केला. तो कमी शिकलेला आणि ड्रायव्हरची नोकरी करत असल्यामुळे लग्नाला नकार दिला.
असे असताना मुलीने दुसरे कोणाबर लग्न करणार नसल्याचे सांगितले. मुलीच्या हट्टापुढे आणि प्रेमापोटी तीच्या आई-वडिलांनी तिचे संजयसोबत लग्न लाऊन दिले. नंतर मात्र संजय हा ४५ वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेचा प्रेमात पडला. त्या भाजीविक्रेता महीलेसोबत रात्री तिच्या घरी जायचा. तिच्या घरी दोघेही दारू प्यायचे आणि तिथे ते दोघे पती-पत्नीसारखे राहत होते.
ही गोष्ट जेव्हा प्राध्यापिका तरूणीला समजली तेव्हा तीच्या पायाखालची जमीनच सरकली. रात्री घरी आलेल्या संजयला तिने विचारले असता त्याने खरी हकीकत सांगितली. तरूणीने तात्काळ भरोसा सेल गाठले. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी भाजी विक्रेत्या महीलेला समुपदेशन केले. यामुळे प्राध्यापिकेचा संसार पुन्हा रुळावर आला.