Nagpur News : भंडारा येथील पवनी येथे आनंद जिभकाटे यांची गांधी विद्यालय नावाने शिक्षण संस्था आहे. यामध्ये नितीन हा संस्थेत शिक्षक असताना विद्यार्थ्यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली. नंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली. समितीने नितीनला दोषी ठरवत बडतर्फ केले. बडतर्फ झाल्याने नितीनला राग अनावर झाला.
त्याने तोंडाला चिकटपट्टी बांधून शिक्षणसंस्था चालकाच्या पत्नीवर हल्ला केला. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेने संतप्त नागरिकांनी या शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला आहे.
यात शिक्षकही जखमी झाला आहे. पोलिसांनी शिक्षकाची सुटका केल्याने अनर्थ टळला. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग मार्गावरील नवीन नंदनवन येथे घडली. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी नितीन हा नागपुरात आला.
नंतर नितीन हा जिभकाटे यांच्या नवीन नंदनवन येथील घरात घुसला. यावेळी संजीवनी या घरी एकट्या होत्या. त्याने संजीवनी यांना ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे संजीवनी घाबरल्या.
त्यांनी आरडाओरडा करू नये म्हणून नितीनने त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी चिटकवली. काहीच चूक नसताना मला बडतर्फ केले. आता बघा मी काय करतो, असे म्हणत नितीनने लोखंडी रॉडने संजीवनी यांच्या दोन्ही हातावर वार केले. नंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने जवळचे लोक जमा झाले.
दरम्यान, शेजाऱ्यांनी पकडून नितीनला चोप देण्यास सुरुवात केली. दरम्यान एका नागरिकाने नंदनवन पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील याठिकाणी दाखल झाले. नंतर त्याची सुटका करण्यात आली. पोलिसांनी गंभीर दुखापतीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून नितीनला अटक केली
दरम्यान, शाळेविरुद्ध तक्रारी करण्यास सुरुवात केली. मात्र कारवाई होत नसल्याने नितीनचा संताप वाढला. यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.