नागपूर हादरलं! सुनेने केला सासूचा मर्डर, लहान मुलाने ते दृश्य बघितलं, अन्…

सुनेकडून सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी मारेकरी सुनेला अटक केली आहे. सुनेला पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले आहे.

पूनम आनंद शिखरवार (वय ३८) असे सुनेचे तर तारादेवी ब्रिजराज शिखरवार (वय ८०, रा. गुडधे लेआउट, भामटी मार्ग), असे मृत सासूचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत अशी की, आजीचा मर्डर झाला, लवकर चला, अशी आरडाओरड करीत मुलाने वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वृद्धेच्या हत्याकांडाची घटना उघडकीस आली. पूनम ही मनोरुग्ण असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

आनंद हे घराजवळीलच गॅरेजमध्ये गेले होते. मुलगा दिव्यांश हा बाहेर खेळायला गेला होता. यावेळी तारादेवी पलंगावर झोपल्या होत्या. पूनमने चाकूने गळ्यावर वार करून तारादेवी यांची हत्या केली. यावेळी घरात कोणी नव्हते.

दरम्यान, संध्याकाळी दिव्यांश हा खेळून घरात आला. पलंगावर त्याला ताराबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. पूनम पलंगावरच बसली होती. हा सगळा प्रकार पाहून दिव्यांश घाबरला. तसेच त्याने आरडाओरडा केला.

तो लगेच पळत पळत गॅरेजमध्ये गेला. घाबरत त्याने वडिलांना याबाबत माहिती दिली. ते तातडीने घरी आले. त्यानंतर एका शेजाऱ्याने प्रतापनगर पोलिसांना कळविले. यावेळी याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.