Nagpur Woman Brain Dead : नागपूर येथे अपघातात मेंदूमृत घोषित झालेल्या महिलेच्या अवयवदानाने तिघांचे आयुष्य उजळले आहे. जयताळा भागात सध्या सर्कस सुरू आहे. ती पाहण्यासाठी ज्योती व अन्य यावेळी माघारी येत असताना हा अपघात झाला.
एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना विवेका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला मार लागला होता. गेले दोन दिवस तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारास कोणताही प्रतिसाद त्या देत नव्हत्या.
दरम्यान त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना डॉक्टर तज्ज्ञांच्या चमूने मेंदूमृत घोषित केले. ज्योती राजकुमार डोंगरे (वय ४५) असे त्यांचे नाव आहे. नंतर डॉ. अजय कुर्वे व सुषमा अवचार यांनी मुलगी साक्षी, पती राजकुमार यांचे अवयवदानाविषयी समुपदेशन केले.
त्यांनी संमती दिल्यानंतर विभागीय प्रत्यारोपण समितीला कळविण्यात आले. इंदोरा येथील रहिवासी होत्या. त्यांच्या यकृताचे प्रत्यारोपण सेव्हन ६८ वर्षीय पुरुषावर करण्यात आले. एक किडनी केअरमध्ये महिलेला, तर दुसरी ३१ वर्षांच्या पुरुषाला देण्यात आली. फुप्फुस प्रत्यारोपणासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम नव्हते. मात्र तिघांना याचा फायदा झाला.
रुग्णालयाच्या वतीने ज्योती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच त्यांचे पार्थिव घरी पाठविण्याची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली. या घटनेमुळे मात्र त्यांच्या पतीचे आभार व्यक्त केले जात आहेत.
अशा वेळी माणूस कोणत्याही मनःस्थितीत असतो. मात्र त्यांनी संयम दाखवला आणि याबाबत निर्णय घेतला. यामुळे आता तिघांना जीवनदान मिळाले आहे. या घटनेची सध्या नागपूरमध्ये चर्चा सुरू आहे.