Nahik news : सध्या पोलीस दलात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अंबड पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, गुन्हे शाखेत पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अशोक नजन या पोलिस अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यातच स्वतःच्या केबिनमध्ये सकाळच्या सुमारास स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली. याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
याबाबत आता त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाले असून त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मात्र यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
या पोलीस अधिकाऱ्याने अचानक आत्महत्या केल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिस ठाण्याच्या परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. ऑन ड्युटी पोलिस ठाण्यात आत्महत्या केल्याची वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी आल्यानंतर याठिकाणी गर्दी कमी केली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. याबाबत कुटूंबाला माहिती देण्यात आली.
याबाबत माहिती झाल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. यामुळे याबाबत सखोल तपास करणे आवश्यक आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.