---Advertisement---

साताऱ्यातील पुसेसावळी दंगलप्रकरणी भाजपच्या बड्या नेत्याचे नाव पुढे, धक्कादायक माहिती आली समोर, गुन्हाही दाखल होणार

---Advertisement---

साताऱ्याच्या पुसेसावळीमध्ये सोशल मीडियाच्या पोस्टवरुन दोन गट आपापसांत भिडले. यामुळे मोठा राडा झाला आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर 15 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यानंतर काही वाहनं पेटवण्यात आली, तर प्रार्थनास्थळांचीही जाळपोळ करण्यात आली. यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिस उपस्थित होते.

असे असताना आता पुसेसावळी दंगलप्रकरणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास मुस्लिम समाजाने नकार दिला. यामुळे वातावरण तापले होते.

त्यांनी जिल्हा रुग्णालय परिसरात ठिय्या मारला. याबाबत तक्रार देण्यासाठी समाजाने पोलिस  अधीक्षकांची भेट घेतली. यामध्ये पुरवणी जबाबात भाजपचे पावसकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याने त्या युवकाचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

यानंतर पुसेसावळी आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी या प्रकरणात १०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. याठिकाणी विशिष्ठ समुदायास यामुळे लक्ष्य करण्यात आले आहे.

दरम्यान, मुस्लिम समाजाचे लोक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. जोपर्यंत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करून अटक होत नाही. तोपर्यंत युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला होता.

दरम्यान, 10 सप्टेंबर रोजी येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. पोस्टवरुन रात्री उशीरा युवकांच्यामध्ये दंगल उसळली. या दंगलीत व जाळपोळीत 2 दुकाने आणि 2 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. यानंतर वाद वाढत गेला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---