प्रियकरासोबत बाथरुमध्ये गेलेली मुलगी बाहेर येताच करू लागली उलट्या; प्रियकरलाही… नांदेडमधील घटनेने खळबळ

असे म्हणतात प्रेम आंधळे असते, त्यामुळे आंधळ्या प्रेमातून अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक घटना नांदेडमधून समोर आली आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. लग्नाला नकार दिल्यामुळे प्रियकर आणि प्रेयसीने टोकाचे पाऊल उचलेले आहे.

प्रेम विवाहसाठी नकार दिल्यामुळे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला विष पाजले आणि नंतर आपण स्वत: विष प्राशन केले आहे. या घटनेमध्ये प्रेयसीला आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधित घटना ही भोपाळवाडी येथे घडली आहे.

मृत्यू झालेल्या प्रेयसीचे नाव सुप्रिया मारोती जाधव असे आहे. मृत झालेली तरुणी आपल्या आई आणि भावासोबत भोपाळवाडी गावात राहत होती. सुप्रिया ही शिक्षण घेत होती. ती बीएच्या प्रथम वर्षामध्ये शिकत होती.

भोपाळवाडीमध्येच रोहिदास जाधव नावाचा तरुण राहत होता. रोहिदास हा तरुणही सुप्रियाच्या घरच्यांच्या ओळखीचा होता. त्यामुळे तो तिच्या घरी जात येत होता. त्यानंतर ओळख वाढली आणि सुप्रियाशी त्याची मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

दोघांच्या प्रेमाबद्दल रोहिदासच्या घरच्यांना कळाले. त्यानंतर त्यांनी सुप्रियाच्या आईकडे लग्नाची मागणी घातली. पण सुप्रियाच्या आईने सुप्रिया आणि रोहिदास यांच्या लग्नाला नकार दिला. त्यामुळे सुप्रिया आणि रोहिदास दोघेही नाराज होते. अशातच रोहितदास हा ३ जूलैला सुप्रियाच्या घरी गेला.

रोहिदास मध्यरात्री सुप्रियाला भेटायला आला होता. त्याने त्याच्यासोबत स्प्राईटच्या बॉटलमध्ये विष आणले होते. तो सुप्रियाला घेऊन बाथरुममध्ये गेला आणि तिथे त्याने सुप्रियाला विष दिले.त्यानंतर तो आणि ती बाहेर आले. त्याचवेळी सुप्रियाच्या आईलाही जाग आली होती. तिने बघितले की मुलगी बाथरुममधून बाहेर आली आणि तिला अचानक उलट्या होत होत्या. आईने विचारले असता तिने सांगितले की रोहिदासने तिला विष दिले आहे.

थोड्याचवेळात रोहिदासनेही घरी जाऊन विष पिले. दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान सुप्रियाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.