Nanded news : तरुण पोत्यात तलवारी भरुन घेऊन आले आणि या गँगने तिघांवर सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
येथील सराफा बाजारात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, मयत सागर पवार हा डेली निड्स आणि फायनान्सच्या व्यवसायात आहे. मोक्काचा आरोपी असलेल्या केशव पवारने सागरकडे खंडणी मागितली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता.
नंतर हा वाद वाढतच गेला. या वादातूनच आरोपी केशवने सागरवर वार केले आहेत. रात्री केशव पवार आपल्या गँगमधील मुलांना घेऊन सागर यादव याला शोधत सराफा बाजारात आला. यावेळी बाजारात मोठी वर्दळ होती.
त्याने पोत्यात भरुन तलवारी आणल्या होत्या. त्या घेऊन केशव पवारच्या गँगने सागर यादव आणि त्याच्या भावावर वार केले. सागर हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. यावेळी त्याच्यावर अनेक वार करण्यात आले.
यामध्ये त्याचा जीव गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याघटनेने नांदेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी काहींना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणातील 17 आरोपींना अटक करण्यात आली असून मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे. या घटनेने मात्र एकच खळबळ उडाली आहे.