Nanded news : मोबाईलमुळे अनेकांचे जीव गेलेल्या घटना समोर असताना आता नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील राम दिलीप जटाळे या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. या घटनेला देखील मोबाइल जबाबदार आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोबाईलमध्ये मग्न होऊन कानात हेडफोन टाकून तो चालत होता. त्याला रेल्वेरुळ आल्याचेही समजले नाही. यामुळे सुसाट आलेल्या रेल्वेचा धक्का लागला आणि या विद्यार्थ्याला प्राण गमवावा लागला आहे. यामुळे मोबाईल किती जीवघेणा ठरतोय हे समोर आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवटचा असलेला राम आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. विवेकानंद महाविद्यालयात बारावीत तो शिकत होता. मात्र त्याचे दुर्दैवी निधन झाले आहे.
दरम्यान, ४ ऑक्टोबरला सतीश सोबत तो शिवाजीनगर परिसरात नाश्ता करण्यासाठी गेला होता. नाश्ता करून परत हॉस्टेलकडे निघाला असताना हा अपघात झाला. तो मोबाईलमध्ये इतका मग्न होता की त्याला रेल्वेचा आवाज देखील आला नाही.
त्याच्या कानात हेडफोन होते. त्याला सोबत असलेल्या मित्राने आवाज दिला पण त्याला ऐकू गेले नाही. यामुळे रेल्वेची जोरदार धडक त्याला बसली. यामध्येच त्याचे निधन झाले आहे.
दरम्यान, तो मोबाईलमध्ये गाणी ऐकत असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे मोबाईलचा वापर किती करायचा आणि कधी करायचा याबाबत थरकाप उडवणारी माहिती यामधून समोर आली आहे. यामुळे मोबाईल वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे.