Nanded Police : नांदेड पोलीस आत्महत्या प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर, महिलेच्या ‘त्या’ मागणीमुळे संपवले जीवन

Nanded Police : ड्युटी संपवून गावाकडे परत जात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू होता.

उस्माननगर ते कलंबर रोडवरील पत्राच्या एका शेडमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलीस तपास करत होते. गोविंद मुंडे असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आता यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गोविंद मुंडे यांच्याकडे एका महिलेने लग्नाचा तगादा लावला होता. यामुळे पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी मृत पोलिसाच्या पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेसह तिघांना अटक केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये वसमत येथील एका महिलेशी त्यांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर दोघेजण फोनवर देखील बोलत होते. मुंडे हे विवाहित असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

मृताच्या पत्नीने सदर महिलेला फोनवरून संपर्क साधून समजूत काढण्याची प्रयत्न केला होता. पण मुंडे यांना मानसिक त्रास देणे सुरूच होते. यामुळे त्यांनी अखेर आत्महत्या केली. यामुळे याचा तपास सुरू होता.

रात्री ड्युटी संपल्यानंतर गोविंद मुंडे हे दुचाकीने गावाकडे जात होते. उस्माननगर ते कलंबर मार्गे जात असताना पत्राच्या शेडजवळ ते थांबले. याठिकाणी त्यांनी आपल्या जवळील सर्व्हिस रिवॉल्व्हर हनुवटीला लावून गोळी मारून घेतली.

हनुवटीतून मारलेली गोळी कवटीच्या आरपार झाली होती. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी देखील मिळाल्याची माहिती आहे. उस्माननगर पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला.

डॉग युनिट, फोरेन्सीक टीमला देखील पाचारण करण्यात आले होते.  दरम्यान, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक पोलीस नांदेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर रुतुराज जाधव यांच्याकडे ते अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे.