Nanded Police : ड्युटी संपवून गावाकडे परत जात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
उस्माननगर ते कलंबर रोडवरील पत्राच्या एका शेडमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. गोविंद मुंडे असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
आत्महत्या कशासाठी केली गेली, याबाबत याबाबत अजून माहिती समोर आली नाही. रात्री ड्युटी संपल्यानंतर गोविंद मुंडे हे दुचाकीने गावाकडे जात होते. उस्माननगर ते कलंबर मार्गे जात असताना पत्राच्या शेडजवळ ते थांबले.
याठिकाणी त्यांनी आपल्या जवळील सर्व्हिस रिवॉल्व्हर हनुवटीला लावून गोळी मारून घेतली. हनुवटीतून मारलेली गोळी कवटीच्या आरपार झाली होती. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी देखील मिळाल्याची माहिती आहे. उस्माननगर पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. डॉग युनिट, फोरेन्सीक टीमला देखील पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक पोलीस नांदेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर रुतुराज जाधव यांच्याकडे ते अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे.