सप्तशृंगी गडावर भीषण अपघात, २२ भाविकांसह बस दरीत कोसळली; वाचून अंगावर काटा येईल

गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. बुलढाण्यात एका बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमध्ये भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे.

सप्तश्रृंगी घाटामध्ये एका बसचा अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे तर २२ जण जखमी झाले आहे. त्यामध्ये जे प्रवाशांना किरकोळ मार लागला होता. त्यांच्यावर प्रथोमचार करुन त्यांना सोडून देण्यात आले आहे. पण जे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

ही बस सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना आणत होती. पण बस घाटात असताना गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की बस थेट दरीत जात होती.

बसचा अपघात हा सकाळी साडेसहाच्या दरम्यान घटना आहे. ही बस सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्याच्या खामगावमध्ये चालली होती. यामध्ये २२ प्रवासी होते. त्यामध्ये १६ जण हे अमळनेर तालुक्यातील होते, तर ४ प्रवासी हे गडावरील होते. तर इतर दोन हे बस ड्रायव्हर आणि कंडक्टर होते.

या बसचे चालक गजानन टपके होते, तर कंडक्टर हे पुरुषोत्तम टिकार होते. या अपघातात गजानन टपके हे गंभीर जखमी झाले आहे, अशी माहिती खामगाव आगार सहाय्यक कर्मचारी शुभांगी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.

सध्या सर्वत्र पाऊस आहे. तसेच धुके सुद्धा खुप असतात. त्यामुळे घाटाच्या वळणावर ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच तिथे बचावपथक पोहचत त्यांनी जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणपती पॉइंट वणी जवळ बस खाली उतरत असताना हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची पुर्णपणे काळजी घेण्यात येणार आहे, असे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.