Nashik news : नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिन्नर येथे पोलिसांनी अचानक कॉफी शॉपवर छापे टाकत कारवाई केली. या कारवाईत तीन कॉफी शॉपमधील अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याठिकाणी असलेल्या चौदाचौक वाडा परिसरातील सांगळे कॉम्प्लेक्समध्ये कॉफी शॉपमध्ये अवैध धंदा सुरू होता. नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तीन कॉफी शॉपमधील अय्याशीचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कॉफी शॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्भनिरोधक आढळून आल्या आहेत.
अनेकदा या कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे सुरू होते. याबाबत तक्रारी देखील येत होत्या. याठिकाणी अत्याचाराच्याही घटना घडल्या आहेत. याकडे सिन्नर पोलिसांचे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिक सांगत होते.
याठिकाणी एका सुजाण नागरिकाने थेट जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने तीन कॉफी शॉपवर छापा टाकला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
अचानक छापा पडल्याने कॉफीशॉप चालकांची धांदल उडाली. त्यांनी तेथून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कॉफी शॉपमध्ये छोटे-छोटे कंपार्टमेंट करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. यासाठी तासावर पैसे आहेत.
त्यात बसण्यासाठी सोफ्याची व बेडचीही व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी अंधार केला आहे. तसेच अश्लील चाळे करण्यासाठी अनेक प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे कारवाई करण्याची मागणी होत होती.