Nashik news : पत्नीचे अनैतिक संबंध, पतीला मानसिक त्रास, पतीने उचललं टोकाचे पाऊल..

Nashik news : नाशिकमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बायको आणि तिच्या प्रियकाराच्या मानसिक त्रासाला कंटाळुन पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे याचा सध्या तपास सुरू आहे.

या घटनेने संपुर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी असे आत्महत्या केलेल्या ३४ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात राकेश यांची बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल केली होती.

नंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी गंगापुर पोलिसांना बापू पुल परिसरात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. पोलिसांनी मृतदेहाबाबत चौकशी केली असता अंबड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असलेल्या राकेश याचाच हा मृतदेह असल्याचे समोर आले.

यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना तपासात एक धक्कादायक बाब उघडकीस आली. यामध्ये बायको आणि तिचा प्रियकर राकेश यांना मानसिक त्रास देत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कुटूंबातील सदस्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने राकेश मानसिक तणावात गेला होता. पत्नी आणि तिचा प्रियकर सतत त्रास देत असल्याने पती राकेशने जीवन संपवल्याचे समोर आले.

दरम्यान, या प्रकरणी पत्नी आणि बाॅयफ्रेंड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. या घटनेमुळे मात्र नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.