मामीच्या प्रेमात गुंग झाला भाचा, थेट मामाचाच काढला काटा, दारु पाजून रेल्वे ट्रॅकवर झोपवल, अन्…

मामी आणि भाच्याची एक धक्कादायक प्रेमकहाणी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मामी सोबतच्या प्रेमसंबंधामुळे भाच्या मामाचा काटा काढल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

बरेली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येमध्ये भाच्याला त्याच्या मित्रानेही साथ दिल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मामी ही भाच्याच्या प्रेमात असल्याची बोलले जात आहे.  यामुळे हे एकतर्फी प्रेम नसल्याचे सांगितले जात आहे.

मामी आणि भाचा एकमेकांच्या प्रेमात होते. यामुळे त्यांनी मामाला संपवण्याचा प्लॅन केला. त्यांनी मामाला बेशुद्ध अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर झोपवले. धक्कादायक प्रकार म्हणजे मामी आणि भाच्याचे लग्नाआधीच प्रेमसंबंध होते. पतीच्या हत्येनंतर महिला प्रेमीसोबत राहण्याच्या विचारात होती. मात्र, त्याआधीच या प्रकरणाचा खुलासा झाला.

लग्नानंतर रामवीर तिच्या मार्गात आला, त्यामुळे आरतीने कट रचून पतीची हत्या केली. प्रेमी मानवेंद्र आणि त्याचा मित्र सौरव याने आरतीचा पती रामवीर याला पार्टीच्या बहाण्याने बोलावले. त्याला दारू पाजली. नंतर त्याला रेल्वे रुळावर फेकले. यानंतर रेल्वेची धडक बसून रामवीरचा मृत्यू झाला. याबाबत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या भाच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून पतीच्या हत्येचा कट रचला. भाच्याने त्याच्या मित्रासोबत मिळून मामाची हत्या केली. महिलेने तिचा प्रेमी आणि प्रेमीच्या मित्रासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला.