पुणे अपघात प्रकरणात आता नवीन ट्विस्ट, धनिकपुत्राच्या बापाने केला भलताच दावा, नेमकं काय म्हणाले?

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी सध्या अनेक प्रयत्न केले जात आहेत. आता एक नवीन कांगावा पुढे येत आहे. बिघाड असतानाही पोर्शे कार विशाल अग्रवालने मुलाला चालवायला परवानगी दिली, असा जबाब चालकाने पोलिसांना दिला. परंतु बिघडलेली कार एखादा पिता आपल्या मुलाला कसा देईल, असा प्रश्न कोणत्याही सुज्ञान व्यक्तीला पडेल.

यामुळे या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. पुण्यातील अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशल अग्रवालसह तिघांना काल न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीत कोठडी सुनावली आले. या अपघाताच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

आता या प्रकरणी नवा दावा केला जात आहे. अपघात झाला त्यावेळी मी नाही, तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी केला आहे. यामुळे आता याची वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आरोपीचा वडील बिल्डर विशाल अग्रवालनंदेखील त्याच्या जबाबत असाच दावा केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे काहीही करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, दोघांच्या वक्तव्यानंतर बापलेकाची जोडगोळी पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विशाल अग्रवाल यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. विशाल अग्रवाल यांच्याकडून त्यांचे वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. विशाल अग्रवाल यांचा बचाव करताना आलिशान पॉर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.

यामुळे हे केवळ त्याला वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात आहेत. याबाबत विशाल अग्ररवाल यांचे वकील म्हणाले, अपघातापूर्वीत कारमध्ये बिघाड असल्याचे विशाल अग्रवाल यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी या बिघाडासंदर्भात कंपनीला माहिती दिली होती. असे असताना कंपनीने त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने विशाल अग्रवाल यांनी ग्राहक तक्रार निवाारण आयोगात तक्रार केली होती.