बॉलिवूडमधून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. नितीन देसाई यांचा मृतदेह मुंबईजवळील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडाले आहे.
नितीन देसाई यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यानंतर पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अद्याप त्याच्या मृत्यूच्या कारणाविषयी अधिक माहिती सामायिक केलेली नाही, परंतु प्राथमिक अहवालात त्यांनी जीवन संपवल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्याप पोलिसांना कोणतीही नोट सापडलेली नाही.
या प्रकरणाची माहिती देताना रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे म्हणाले, ‘आज सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडिओमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला. आम्ही सर्व पैलू तपासत आहोत’.
नितीन देसाई आर्थिक संकटाने हैराण!
त्याचबरोबर प्रसिद्ध कला दिग्दर्शक आर्थिक अडचणीत असून त्यांचा स्टुडिओ व्यवस्थित चालत नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
कर्जतचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी नितीन देसाई यांच्या निधनाची माहिती दिली आहे. नितीन देसाई यांनी आर्थिक त्रासाला कंटाळून जीवनाचा अंत केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले नितीन देसाईंचा कर्जत येथील स्टुडीओ माझ्या मतदारसंघात येतो.
आमदार महेश बालदी म्हणाले की, मी काही दिवसांपुर्वी नितीन देसाईंशी बोललो होतो. ते गेल्या अनेक दिवसांपासून ते आर्थिक संकटांचा सामना करत होते. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आज सकाळी एनडी स्टुडिओत आपले जीवन संपवले.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिथे शुटींग होत नव्हते. अनेक लोकांशी डील करूनही त्या डील प्रत्यक्षात आल्या नाहीत. बॉलीवूडमधील काही मुख्य कलाकारांसोबत नितीन देसाईंचा वाद झाला आणि त्यामुळे त्यांनी एनडी स्टूडीओत न येण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिथे बऱ्याच दिवसांपासून सिनेमांचे शुटींग होत नव्हते असेही महेश बालदी यांनी सांगीतले
नितीन देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये १९९९ साली डॉ.आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचाही समावेश आहे. यासोबतच ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लगान’ आणि ‘देवदास’साठीही त्यांचा गौरव करण्यात आला. शेवटच्या वेळी त्यांनी ‘पानिपत’ चित्रपटासाठी काम केले होते.
2003 मध्ये त्यांनी एनडी स्टुडिओची स्थापना केली. जो सुमारे 43 एकरमध्ये पसरलेला आहे. या स्टुडिओमध्ये भारतातील पहिले थीम पार्कही तयार करण्यात आले आहे.
नितीनने १९८९ मध्ये ‘परिंदा’ चित्रपटातून कला दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. परिंदा नंतर 1942: ए लव्ह स्टोरी (1993), खामोशी: द म्युझिकल (1995), प्यार तो होना ही था (1998), हम दिल दे चुके सनम (1999), मिशन कश्मीर (2000), राजू चाचा (2000) ), देवदास (2002). त्यांनी मुन्नाभाई M.B.B.S. (2003), दोस्ताना (2008), आणि वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई (2010). पानिपत (2019)