बॉलीवूडमधील मोठमोठ्या लोकांकडून नितीन देसाईंना..; मनसेच्या बड्या नेत्याचा धक्कादायक खुलासा

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. डोक्यावरच्या वाढत्या कर्जामुळे त्यांनी आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. पोलिस अजूनही त्यांच्या मृत्यूबाबत तपास करत आहे.

नितीन देसाई मंगळवारी रात्री उशिरा एनडी स्टुडिओमध्ये गेले होते. त्यानंतर सकाळी जेव्हा कर्मचारी तिथे आले, तेव्हा त्यांनी नितीन देसाई यांचा मृत्यू झाल्याचे बघितले. मृत्यूच्या आधी त्यांनी काही व्हॉईस नोट्स रेकॉर्ड करुन ठेवल्या होत्या.

त्या व्हॉईस नोट्समध्ये त्यांनी चार व्यवसायिकांची नावे घेतली होती. पोलिस त्यांचीही चौकशी करणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अशात एका मनसे नेत्याने गंभीर दावे केले आहे.

नितीन देसाई यांच्या जाण्याने अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. तसेच राजकीय नेते सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या मृत्यूवर भाष्य करत आहे. आता रायगडचे मनसेचे नेते जितेंद्र पाटील यांनी नितीन देसाईंच्या मृत्यूवर भाष्य केलं आहे.

नितीन देसाई गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. अनेक गोष्टींवर ते माझ्याशी चर्चा करायचे. त्यांच्या आर्थिक अडचणी तर होत्याच, पण त्यांच्याच क्षेत्रातील काही नामांकित व्यक्तींकडून त्यांच्या स्टुडिओमध्ये शुटींग येऊ दिल्या जात नव्हत्या. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या, असे जितेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच कर्जतचे आमदार महेश बालदी यांनीही नितीन देसाईंच्या निधनावर प्रतिक्रिया दिली होती. नितीन देसाई आर्थिक अडणींचा सामना करत होते. ते खुप तणावातही होते. महिन्याभरापूर्वी आमची भेट झाली होती. तेव्हा त्यांनी इंडस्ट्रीने आपल्याकडे पाठफिरवल्याचे सांगितले होते, असे महेश बालदी यांनी म्हटले आहे.