नितीन देसाई यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ते प्रसिद्ध कलादिग्दर्शक होते. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले आहे. कर्जामुळे त्यांनी असा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
कलादिग्दर्शकासोबत नितीन देसाई यांना चांगलं माणूस म्हणून ओळखलं जात होतं. स्वत: कर्जात असताना ते लोकांची मदतही करत होते. काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची घटना घडली होती. तिथेही त्यांनी मदत केली होती.
यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील अनेक गावांचं मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पाऊस आणि वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे अनेक गावांमध्ये पाणी आले होते. यावेळी नितीन देसाई हे सुद्धा अडचणीत आलेल्या लोकांच्या मदतीला धावून गेले होते.
इर्शाळवाडीत झालेल्या घटनेमुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. तेव्हा त्या कुटुंबांना आधार मिळावा यासाठी नितीन देसाई यांनी त्यांना राहण्यासाठी तंबु पाठवले होते. लोकं सुरक्षित राहावे असे यासाठी त्यांनी तिथे आपली माणसंही पाठवली होती.
इर्शाळवाडीत दरड कोसळ्यामुळे काही लोकांचे मृत्यू झाले होते. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. त्यांची घरं त्यामध्ये उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे लोकांना राहण्यासाठी घरंच नव्हती. त्यावेळी रायगडचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.
सोमनाथ घार्गे यांनी नितीन देसाई यांना मदत मागितली. त्यानंतर फक्त १५ मिनिटांमध्येच नितीन देसाई यांनी तंबुंची मदत त्याठिकाणी पाठवली होती. पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनीच याबाबत माहिती दिली आहे.
नितीन देसाई हे खुप चांगले व्यक्ती होते. त्यांनी एका फोनवर मदत केली होती. तसेच गावकऱ्यांसाठी आपण काय काय करु शकतो हे देखील त्यांनी विचारले होते. एका फोनवर त्यांनी माणसे आणि तंबु गावकऱ्यांच्या मदतीसाठी पाठवले होते, असे सोमनाथ घार्गे यांनी म्हटले आहे.