मराठी गायक अवधूत गुप्तेचा खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत असतो. आधी या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत दिली होती. आता या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुलाखत दिली आहे.
या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी दिल खुलासपणे अवधुत गुप्तेसोबत गप्पा मारल्या आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. या प्रश्नांमध्ये त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यातील खुपणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित करण्यात आला होता. त्यावर नितीन गडकरी यांनी जे उत्तर दिले आहे, ते चांगलाच चर्चेचा विषय ठरले आहे.
पंतपधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी खुपणारी गोष्ट म्हणजे ते स्वत: जरा जास्तीच काम करतात. परिश्रम घेतात आणि सगळ्यांना कामही करायला लावतात. त्यामुळे लोकंही त्या कामांमुळे थकून जातात, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
अमित शाहांबद्दलही त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.अमित शाहांमध्ये खुपणारी गोष्ट ही आहे की ते कायम गंभीर असतात. ते नेहमीच टेंशनमध्ये दिसतात, असे नितीन गडकरी यांनी प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.
तसेच त्या सेगमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही फोटो दाखवण्यात आला होता. शरद पवारांमध्ये काय खुपतं? असा सवाल अवधुत गुप्तेने विचारला होता. त्यावर नितीन गडकरी म्हणाले की, शरद पवार हे कधीही स्पष्ट बोलत नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे राजकारण देशातल्या राजकारणापेक्षा वेगळे आहे. मी सुद्धा १८ वर्षे विधीमंडळात होतो. टीका करायचो पण व्यक्तिगत मैत्री होती. पण आता आधीसारखी व्यक्तिगत गोष्टी राहिलेल्या नाही. आता थोडं जास्त झालंय.