पुण्यात लोकसभेसाठी ओबीसी की मराठा? काँग्रेसकडून तीन नावे चर्चेत, एकाच नाव जवळपास निश्चित….

सध्या राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सगळे पक्ष तयारी करायला लागले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी काही नावे पुढे आली आहेत. याबाबत अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे. यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार हे लवकरच स्पष्ठ होणार आहे.

यामध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी आमदार मोहन जोशी यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची, यावरून चर्चा सुरू आहे. सध्या आमदार रवींद्र यांच्या नावाचा विचार सुरू आहे. कारण त्यांची पुण्यात मोठी लोकप्रियता आहे. त्यांनी कसबा पोट निवडणुकीत बाजी मारली होती.

काँग्रेसमधील एक गट पुणे शहरातून उमेदवारीसाठी ओबीसी चेहरा असावा, अशी मागणी करत आहे, तसेच दुसऱ्या गटाकडून मराठा उमेदवारासाठी दिल्लीत फिल्डिंग लावण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे आता अंतिम निर्णय काय होणार हे लवकरच समजेल. सध्या अनेक नेते पक्षाला सोडून गेले आहेत.

सध्या उमेदवारीच्या स्पर्धेत माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया उच्चपदस्थ सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र त्यांचा निभाव लागणे काहीशे अवघड आहे. कारण भाजपकडून बडा नेता रिंगणात उतरवला जाणार आहे.

शनिवारी काँग्रेस भवनाच्या प्रांगणात महाविकास आघाडीचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी शरद पवार, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे.

याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यावेळी इच्छुक शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी एक बैठक देखील झाली. या बैठकीसाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, ठाकरे गटाचे गजानन थरकुडे, संजय मोरे, ‘राष्ट्रवादी’चे प्रशांत जगताप उपस्थित होते.

पुणे काँग्रेसकडून धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांची काँग्रेसमधील लोकप्रियतताही अधिक आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी समर्थकांची मागणी आहे. यामुळे आता पक्ष काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.