ऑनलाईन गेमचा नाद लई भंगार! घरी सापडली करोडोंची कॅश, पैसे मोजून अधिकारीही दमले, नक्की काय घडलं? वाचा..

नागपूर: ऑनलाइन गेमिंगमध्ये नागपूरच्या एका व्यापाऱ्याला 58 कोटी रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी एका संशयित बुकीचा शोध घेतला आणि शनिवारी चार किलो सोन्याच्या बिस्किटांसह 14 कोटी रुपयांची रोकड जप्त केली, असे एका उच्च पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

तथापि, अनंत उर्फ ​​सोंटू नवरतन जैन असे आरोपीचे नाव असून, तो नागपूरपासून 160 किमी अंतरावर असलेल्या गोंदिया शहरातील त्याच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वीच पळून गेला. तो दुबईला पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

“जैन यांनी तक्रारदाराला तुफान नफा कमावण्याची नामी संधी म्हणून ऑनलाइन गेम खेळण्यास पटवले होते. सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर अखेर व्यावसायिकाने जैन यांच्या समजुतीला बळी पडून हवाला व्यापाऱ्याच्या माध्यमातून ८ लाख रुपये हस्तांतरित केले, असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

जैन यांनी ऑनलाइन गेमिंग खाते उघडण्यासाठी व्यावसायिकाला व्हॉट्सअॅपवर लिंक दिली. कुमार म्हणाले, व्यावसायिकाच्या खात्यात आठ लाख रुपये जमा झाले आणि त्याने जुगार खेळण्यास सुरुवात केली. आरोपीने पैशांचे आमिष दाखवून केसिनो, रमी, तीन पत्ते, क्रिकेट अशा प्रकारच्या गेम खेळून पैसे कमावण्याचे आमिष लोकांना दिले. 

पोलिस आयुक्त म्हणाले, “सुरुवातीच्या यशानंतर, व्यावसायिकाच्या नशिबाने दगा दिला. कारण सुमारे 5 कोटी जिंकल्यानंतर त्याने पुढे 58 कोटी रुपये गमावले.” व्यापाऱ्याला स्वताला फसवल्याचा संशय आला आणि त्याने पैसे परत मागितले, पण जैन यांनी नकार दिला.

“व्यावसायिकाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जैन यांच्या गोंदिया येथील निवासस्थानावर पोलिसांनी छापा टाकला.

या ऑपरेशनमध्ये 14 कोटी रुपये रोख आणि चार किलो सोन्याच्या बिस्किटांसह भरपूर पुरावे जप्त करण्यात आले,” असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. एवढी मोठी रोकड मोजली जात असून जप्तीचा अंतिम आकडा येणे बाकी आहे.