सध्या देशभरात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर बंदी घालून मतपत्रिकांवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे. मात्र ही मागणी सातत्याने फेटाळली जाते आहे. यामुळे आता इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमने एक प्रयोग करण्याचे ठरवले आहे. याबाबत एक बैठक घेण्यात आली.
याबाबत ४०० हून अधिक उमेदवार उभे करून ईव्हीएमला पर्याय देण्याचा देशभर प्रयोग होतो आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीतही हा प्रयोग केला जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत माहिती अशी की, इव्हीएम मशीनविरोधात देशभर लढा सुरू आहे. मतपत्रिकेवर अर्थात बॅलेटवर निवडणूका व्हाव्यात यासाठी नागपूरसह देशात प्रयत्न होत आहेत. अनेकांनी याबाबत 2014 पासून मागणी केली जात आहे. मात्र तसा निर्णय होत नाही.
याबाबत विविध संघटना त्यासाठीचे आंदोलन करीत आहे. न्यायालयात पाठपुरावाही होत आहे. मात्र, न्यायपालिकेकडून तसा निर्णय होत नसल्याने हतबल न होता, यासाठी पर्याय शोधला जात आहे. यामुळे आता एक पर्याय पुढे आला आहे. यामुळे नेमकं काय केलं जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत ४०० उमेदवार उभे झाल्यास इव्हीएमची कमतरता भासेल व मतपत्रिकांवरच निवडणुका घ्याव्या लागतील, अशी भूमिका यावेळी ॲड. कांबळे यांनी मांडली. संघटनेतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी याबाबत चर्चा झाली.
यावेळी संघटनेच्या राष्ट्रीय समन्वयिका स्मिता कांबळे, कॉंग्रेसचे माजी आमदार सुनील केदार, आकाश मून, प्रितम बुलकुंदे, अमन कांबळे व इतर उपस्थित होते. केदार यांनीही बॅलेटवरच निवडणूका घ्याव्यात, या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.