PAK vs AFG : वर्ल्डकपच्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानचा अनपेक्षितपणे पराभव केला. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला अफगाणिस्तानने 8 विकेट्स राखून पराभूत केले. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.
पाकिस्तानच्या पराभवासाठी बाबर आझमने गोलंदाजांना दोष दिला असला तरी पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण या स्पर्धेत चांगले राहिले नाही. हे देखील यासाठी मोठे कारण सांगितले जात आहे. तसेच आधीच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानने अनेक कॅच सोडले.
अनेकदा अगदी सहज आडवता येतील असे चौकारही पाकिस्तानी खेळाडूंना अडवता आले नाहीत. यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. असे असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हा सामना झाल्यावर पाकिस्तानच्या संघात मारामारी झाल्याचे म्हटले जात आहे. संघातील दोन खेळाडूंत मारामारी झाली. एवढेच नव्हे तर काही खेळाडूंनी बाबर आझमवर बहिष्कार टाकला आहे. काही वेळा बाबर एकटा पडत असल्याचा दावा सोशल मीडियावरून होत आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या संघात पराभवानंतर मारामारी झाली नाही, असे पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ म्हणत आहे. पण काही पत्रकारांनी मात्र पाकिस्तानच्या संघात पराभवानंतर मारामारी झाल्याचे म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. पाक संघात कोणतेही मतभेद नाहीत. संघातील सर्व खेळाडू एकमेकांसोबत आहेत. पाक संघात मतभेद असल्याचा केवळ दावा होत आहे. त्याबाबत कोणतेही पुरावे दिले जात नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.