पालघर शहरालगत असणाऱ्या नंडोरे गावात एक दुर्देवी घटना घडली असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी डुकरांसाठी लावलेल्या विद्युत फासाच्या संपर्कात आल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
याठिकाणी रानडुकरांचा मोठा हैदोस पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी कंटाळले आहेत. याठिकाणी शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. यामुळे शेतकरी याचा बंदोबस्त करत आहेत.
दरम्यान, रानडुकरांची शिकार करणे प्रतिबंधक आहे. त्यावर उपाययोजना म्हणून नंडोरे येथील बागायतदाराने आपल्या कुंपणाला विजेचा सापळा रचला होता. मात्र यामध्ये दोन जणांचे जीव गेल्याची घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
रात्री ही घटना घडली. सुजित म्हसकर (वय, 15) व दिनेश बोस (वय, 22) अशी या दोघांची नावे असून हे तरुण पडघे येथील रहिवासी आहेत. काही समजायच्या आतच त्यांचा जीव गेला आहे.
पालघर पोलीस आणि महावितरण प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. या घटनेने मात्र अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारे कुंपण केले आहे.
दरम्यान, या संदर्भात पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी मृतांचे कुटुंबीय दाखल झाले आहेत. या घटनेमुळे कुटूंबाने एकच हंबरडा फोडला. याबाबत पोलीस तपास करत असून अशा प्रकारे घटना भविष्यात घडू नयेत म्हणून काळजी घेतली पाहिजे.