पश्चिम महाराष्ट्रात पुढील २ महिन्यात…; हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पुरही आले आहे. नद्यांची पातळी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनही नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत आहे.

राज्यभरात पाऊस आहे, पण पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाऊस कमी आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहे. पाऊस कमी झाला तर पिकांचे नुकसान होईल, अशी भिती त्यांना आहे. पण आता काळजी करण्याचे कारण नाही, कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातही चांगला पाऊस होणार आहे.

हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी असला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस चांगला पडेल. सर्व धरणे ही कमी वेळात भरुन निघतील, असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे, पण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही. कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातही चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व तळे हे व्यवस्थित भरतील, असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी खुप चिंतेत आहे. पण शेतकऱ्यांनाही चिंता करण्याचे कारण नाही. कारण चांगला पाऊस पडणार असल्यामुळे शेतीचेही काही नुकसान होणार नाही, असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला पंजाबराव डख यांनी भेट दिली होती. त्यावेळी ती बोलत होते.

दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने २३ जूलै ते २६ जूलै चार दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहनही प्रशासन करताना दिसून येत आहे.