आता भाजपमध्ये भूकंप! पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? नाना पटोलेंनी दिली मोठी अपडेट

अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्याची समीकरणेही बदलली आहे. आता येत्या काही दिवसांसही मोठ्या राजकीय घडमोडी होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार आले आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. धनंजय मुंडे आता भाजपमध्ये आल्यामुळे पंकजा मुंडे याच्या अडचणी वाढल्या आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडेही मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंकजा मुंडे काँग्रेस पक्षात जाणार असल्याचीही चर्चा ही राजकीय वर्तुळात होत आहे. आता याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर मोठे विधान केले आहे. पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ही चर्चा रंगली आहे.

सोनिया गांधी आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर नाना पटोले यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे जर काँग्रेसमध्ये सामील होत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे या भाजपच्या सर्वात डॅशिंग महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पण गेल्या काही दिवसांपासून त्या पक्षावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. राज्यातील नेत्यांकडून त्यांना डावललं जात असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

सतत डावललं जात असल्यामुळे ते लवकरच दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा होती. अशात राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी सोनिया गांधीची भेट घेतली आहे. त्यामुळे त्या आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा होत आहे.