Pathardi News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. गाडी घेण्यासाठी माहेराहुन दोन लाख रुपये आणावेत म्हणुन वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ सहन न झाल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तेजश्री धिरज रांधवणे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तेजश्री हिला 9 महिण्याचा मुलगा आहे. दरम्यान तिचा विवाह 13 ऑगस्ट 2020 रोजी तिसगाव येथील धिरज बाबासाहेब रांधवणे यांचे सोबत झाला होता.
तिच्या वडिलांनी लग्नात बारा तोळे सोने व तसेच इतर मानपान देवून मुलगी तेजश्री हिचे लग्न करुन दिले होते. नंतर मात्र कार घेण्यासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणावेत, असे तिला सांगितले गेले. यावर मुलीच्या वडीलांनी सध्या पैसे नाहीत नंतर देईन असे सांगितले. मात्र नंतर तिला त्रास दिला गेला.
तिचा शारीरीक व मानसिक छळ करू लागले तसेच तिला त्रास देवू लागले. दरम्यान, आज ना उद्या पती व सासरचे लोक नीट वागवतील या दृष्टीने तेजश्री नांदत होती. आज ना उद्या मुलीचे चांगले होईल, असे तिच्या वडिलांना वाटत होते. मात्र तुला तुझ्या मुलाला सांभाळता येत नाही. तुझ्या दुधाची त्याला गरज नाही.
तुला स्वयंपाक येत नाही, असे म्हणत तिला त्रास देवू लागले. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता तेजश्री हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
याबाबत विवाहितेचा पती धिरज बाबासाहेब रांधवणे, सासरे बाबासाहेब फकडराव रांधवणे, सासू सुनीता बाबासाहेब रांधवणे, दीर सुरज बाबासाहेब रांधवणे (सर्व रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.