Petrol Diesel Prices : सध्या नवीन वर्ष काही दिवसांवर आलं आहे. अशातच मोदी सरकार नवीन वर्षाचे गिफ्ट देण्याचा प्लॅन आखला आहे. केंद्र सरकार लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे असे झाले तर मोठा दिलासा मिळणार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी योजना आखली जात आहे. त्यामुळे आता नववर्षाला गोड बातमी मिळेल का? असा सवाल विचारला जातोय. सर्वसामान्य लोकांचे याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाने पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव तयार केला आहे. ज्यामध्ये दोन्ही इंधनांमध्ये प्रतिलिटर 8 ते 10 रुपयांची कपात करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
तो लवकरच मंजूर होऊ शकतो. पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे.
आता यासाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी मिळणं बाकी आहे. आयात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सध्या महागाईमुळे मोदी सरकारवर टीका केली जात आहे.
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांची आर्थिक स्थिती चांगलीच असल्याने असा निर्णय घेतला जाऊ शकतो. इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांच्या नफ्यात देखील मागील काही दिवसात वाढ झाली आहे. यामुळे याचा विचार करता याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
त्यामुळे सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असताना मोदी सरकार जनतेला दिलासा देऊ शकतं. हे दर कमी झाले तर इतर महागाई देखील काहीशी कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.