खून केल्यानंतर मेंढपाळ बनून पोलिसांना देत होता चकमा! अखेर पोलिसांनी २१ वर्षांनी ‘असा’ अडकवला जाळ्यात

साताऱ्यातील कोरेगावमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका आरोपीला चक्क २१ वर्षानंतर ताब्यात घेतले आहे. त्याने २१ वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या केली होती. पण पोलिसांना आता त्याला पकडण्यात यश आले आहे.

किसन जाधव असे त्या आरोपीचे नाव आहे. तो भुषणगडचा रहिवासी आहे. त्याने २१ वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या केली होती, असा त्याच्यावर आरोप होता. गेल्या २१ वर्षांपासून तो मेंढपाळ बनून पोलिसांना चकमा देत होता.

आता २१ वर्षानंतर पोलिसांनी किसन जाधवला ताब्यात घेतले आहे. २१ वर्षांपूर्वी कोरेगाव तालुक्यातील एकसळ गावात एका महिलेची हत्या झाली होती. भूषणगडमधील एका युवकाने ती हत्या केल्याचे समोर आले होते.

पोलिस त्याच्या माघावर होती, पण तो आरोपी फरार झाला होता. आता २१ वर्षानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा गेल्या वर्षांपासून मेंढपाळ म्हणून राहत असल्याची माहिती पोलिस अधिक्षक समीर शेख यांना मिळाली होती.

माहिती मिळताच समीर शेख यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना एक पथक तयार करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी भुषणगडला जाऊन किसन जाधवला ताब्यात घेतले आहे. २२ फेब्रुवारी २००२ मध्ये त्याने एका महिलेची हत्या केली होती.

त्या महिलेचे नाव मालन बुधावले असे होते. त्याप्रकरणी किसन जाधव हा आरोपी असल्याचे पोलिसांना समजले होते. त्याच्याविरोधात पुरावेही सापडले होते. पण तोपर्यंत तो फरार झाला होता. तो २१ वर्षांपासून ओळख लपवून मेंढपाळ बनून राहत होता. पण पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे.