सध्या सोशल मीडिया वापराचे प्रमाण खुप वाढले आहेत. अशात अनेक फसवणूकीच्या घटनाही समोर येत असतात. अशीच एक घटना आता कर्नाटकमधून समोर आली आहे. आपले सौंदर्य दाखवत तरुणांना फसवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ती तरुणी मुंबईची असल्याची माहिती मिळत आहे. ती सोशल मीडियावर तरुणांना शोधायची. श्रीमंत मुलांना शोधल्यानंतर ती त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची. तसेच त्यांच्यासोबत अश्लील चॅटींग करायची. त्यानंतर घरी बोलावून त्यांना लुटायची.
एका इंजिनियर तरुणाचीही फसवणूक झाली होती. त्याने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ही टोळी तरुणांना जाळ्यात घेऊन इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी द्यायची, असेही समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा उर्फ मेहर असे त्या तरुणीचे नाव आहे. ती २० ते ५० वयोगटातील तरुणांच्या संपर्कात यायची. त्यानंतर तरुणाला फसवून ती जेपी नगरच्या फेज ५ येथील तिच्या घरी बोलवायची.
तरुण घरी आल्यावर त्याच्यासोबत संबंध बनवण्याचा प्रयत्न करायची आणि त्याचे खाजगी व्हिडिओ बनवायची. त्यानंतर ती त्यांना ब्लॅकमेल करायची. ती इंजिनियर, डॉक्टर, चांगला पगार असलेल्या तरुणालाच फसवायची. तिने तिच्या टोळीसोबत मिळून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त लोकांना फसवलं असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच त्यातून तिने ३५ लाख रुपये मिळवले अशीही माहिती समोर आली आहे. नेहा तरुणांना सांगायची की तिचा नवरा हा दुबईत काम करतो, त्यामुळे तिला शरीरसुख मिळत नाही. त्यावेळी नेहा तिचे फोटो आणि तिच्या घराचा पत्ता तरुणांना पाठवायची.
तक्रार करणारा तरुण ३ मार्च रोजी तिच्या घरी गेला होता. त्यावेळी नेहाने त्याचे बिकीनीमध्ये स्वागत केले. त्यानंतर मिठी मारुन तिने त्याला किस केलं. त्यावेळी खोलीतील तिचे साथीदार त्यांचा व्हिडिओ बनवत होते. त्यानंतर ते अचानक समोर आले आणि त्याला धमकवायला लागले.
तसेच आरोपींनी त्या तरुणाकडून मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर मोबाईलमधील त्याच्या मित्रांचे नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन घेतले. मेहेर मुस्लिम आहे, त्यामुळे तुला इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल. तसे केले नाही तर व्हिडिओ व्हायरल करु अशी धमकी त्यांनी त्यावेळी तरुणाला दिली. त्यावेळी भितीपोटी त्याने त्यांना पैसे दिले. त्यानंतर या तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.