पोलिस कर्मचारी हे नेहमीच त्यांच्या कामांसाठी ओळखळे जातात. ते अनेकदा जीवही वाचवतात. आता अशाच एका पोलिस कर्मचाऱ्याने तीन लोकांना जीवनदान दिले आहे. नागपूरमधून ही घटना समोर आली आहे.
ब्रेन डेड झालेला व्यक्तीचे अवयव दान केले जाऊ शकतात. यंदा नागपूरात अवयवदानाची १४ प्रकरणे यशस्वीरित्या पार पडली आहे. पण हे काम वेगाने होणे गरजेचे असते. या गोष्टीचा विचार करुन एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेऊन तीन लोकांचा जीव वाचवला आहे.
किशोर तिजारे असे पोलिस हवालदाराचे नाव होते. ते नागपूर शहरातील काटोल रोडच्या पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांचा ब्रेन डेड झाला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी ड्युटीवर असताना ते काही अत्यावश्यक कामासाठी गिट्टीखदान चौकात गेले होते. त्यावेळी साडेसातच्या सुमारास त्यांचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबाला बोलावून घेतले. तसेच अवयवदान करायचे असल्यास तुम्ही करु शकतात, असे सांगितले.
कुटुंबाने लगेचच अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये यकृत आणि कॉर्निया हे दान करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर झेडटीसीसीचे प्रत्यारोपण समन्वयक दिनेश मांडपे यांनी यादी तपासून त्यांचे वाटप केले.
किशोर तिजारे यांची किडनी न्यु रा रुग्णालयातील एका ४७ वर्षीय पुरुष रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आली आहे. तर त्यांची दुसरी किडनी ही एका ३० वर्षीय पुरुषाला दान करण्यात आली आहे. तसेच त्यांचे कॉर्निया हे महात्मा इनकम बँकेला दान करण्यात आले आहे.