रस्त्यावर नमाज पढणाऱ्यांना पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले, पोलीस अधिकारी निलंबित, नेमकं घडलं काय?

दिल्लीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी रस्त्यावर नमाज पढणाऱ्या मुस्लीम समाजाच्या एका गटाला एक पोलीस अधिकारी लाथ मारत होता. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. सध्या या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी मुस्लीम समजाचे काही लोक वर्दळीच्या रस्त्यावर नमाज पढत होते.

नंतर दिल्लीच्या इंद्रलोक भागातील एक अधिकारी तेथे येतो आणि त्यांना बाजूला करण्यासाठी त्यांना लाथा मारायला सुरुवात करतो. इंद्रलोक भागातील एका मशिद परिसरात काही लोक रस्त्यावर नमाज पढत होते. त्यांना बाजूला करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने त्यांना लाथा मारल्या.

या घटनेनंतर याठिकाणी लोकं जमा झाले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत डेप्युटी पोलीस कमीशनर एमके मीना यांनी सांगितले की, शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे.

त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. विभागाअंतर्गत चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. संतापलेल्या लोकांनी रस्ता अडवून संबंधित पोलीसावर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी वातावरण शांत केले.

दरम्यान, मशिदीमध्ये जागा नव्हती. त्यामुळे मुस्लीम समाजातील लोक रस्त्यावर येऊन नमाज पढत होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली काँग्रेसने या प्रकारावरुन टीका केली आहे. यामुळे याठिकाणी वातावरण चांगलेच तापले आहे.