कोकणात लोकसभेपूर्वीच मोठा राजकीय धमाका? ‘हा’ नेता ठाकरेंची साथ सोडणार? सगळं ठरलं…

सध्या उद्धव ठाकरेंच्या गटाला कोकणामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील एक प्रमुख आमदार आणि नेते भाजपात असलेल्या राणे कुटुंबियांसंदर्भातील प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंवर नाराज आहे. यामुळे हा नेता ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे.

आता या नेत्याने आपल्याबरोबर विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं म्हणत समर्थकांना एक पत्र लिहून ‘मनातील बोलायचं आहे, खंत व्यक्त करायची आहे, म्हणत कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ठाकरे कुटुंबाचे विश्वासू समजले जाणारे भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा आहे. भास्कर जाधव हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मौन बाळगले आहे. यामुळे याचा अर्थ वेगळाच आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निलेश राणेंबरोबर झालेल्या वादाची दखल पक्ष नेतृत्वाकडून घेतली गेली नाही. यामुळे आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याची माहिती आहे. तसेच इतरही काही कारणं यामागे आहेत. असं काही झालं तर तो ठाकरेंसाठी सर्वात मोठा धक्का असणार आहे.

याबाबत बोलण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण करण्यात आल्याचा उल्लेखही भास्कर जाधवांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पाठवलेल्या संदेशात केला आहे.

यामुळे आता ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी याबाबत एक भावनिक पत्र लिहिले आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांशी बोलून ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच याबाबत अजून माहिती समोर येईल.