राज्यात सध्या अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. पैशांवरुन, रागातून किंवा बदल्याच्या भावनेने लोक जीवही घेताना दिसून येत आहे. अशीच एक घटना इंदापूरमधून समोर आली आहे. पोलिसांना सरडेवाडी लगत असलेल्या शेतात एक मृतदेह आढळून आला आहे.
पोलिसांनी तपास केला असता त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करत आहे. पैसे व मोबाईलसाठी त्यांनी त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी त्यांना सात दिवसांची कोठडी दिली आहे. यावेळी आपणच खून केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. तसेच त्यांचे दोन साथीदार अजूनही फरार झाले आहे. प्रदीप पवार (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आदित्य मोरे (वय २०) आणि बालाजी माने (वय २६) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांचे आणखी दोन साथीदार हे फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. अनोळखी वाहनातून प्रवास करणे तरुणाच्या जीवावर बेतले आहे.
१२ जूलै रोजी हा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला होता. ११ जुलैला रात्री साडेआकराला प्रदीप पुण्याच्या बालेवाडी येथील नातेवाईकांना भेटून बहिणीकडे निघाला होता.पण तो कोणत्या वाहनाने सोलापूरला निघाला होता याबाबत कोणालाही काहीच माहिती नव्हते.
आरोपी हे पुण्यावरुन लातूरला निघाले होते. प्रदीप हा हडपसरवरुन गाडी शोधत होता. त्यामुळे आरोपींनी त्याला सोलापूरला सोडतो असे म्हणत गाडीत बसवून घेतले. त्यानंतर त्याच्याकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत गाडीतच त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्या संपुर्ण शरीराला दोरीने बांधून त्याचा गळा आवळण्यात आला.
तसेच त्याचा खून केल्यानंतर प्रदीपला शेतात फेकून दिले होते. पोलिसांसाठी हे मोठे आव्हान होते, कारण रात्रीच्या प्रवासामुळे त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्येही काही मिळत नव्हते. पण तांत्रिक माहितीवर तपास करत पोलिसांनी अखेर त्या आरोपींना पकडले आहे.