अनेक तेलगू चित्रपटांतून नाव कमावलेल्यानंतर बॉलिवडूमध्येही चित्रपट केलेली अभिनेत्री म्हणजे त्रिशा कृष्णन. ती अनेकदा वेगवेळ्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.
असे असताना यावेळी ती एका निर्मात्याच्या प्रेमात असून ती त्याच्याशी लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे याची चर्चा रंगली आहे. यामुळे आत ती लग्न करणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत माहिती अशी की ती, मल्याळम निर्मात्यासोबत लग्न करणार अशी चर्चा असली तरी त्याचे नाव आणि लग्नाची तारीख काही समोर आलेली नाही. मात्र तिच्या प्रेमाच्या बातम्यांवर अनेकांनी शिक्कामोर्तब केले आहे. ते दोघे 2005 मधील घिल्ली चित्रपटाच्या सेटवर भेटले होते.
असे असताना मात्र त्यांनी या नात्याला कधीही दुजोरा दिला नाही. नंतर बाहुबली फेम राणा दग्गुबतीसोबत त्रिशाचे अफेयर होत. ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. असा खुलासा खुद्द राणाने कॉफी विथ करणमध्ये केला होता.
या दोघांचे प्रायव्हेट फोटोदेखील सोशल मीडियावर लीक झाले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याबाबत तिने काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. असे असताना अचानक 2015 मध्ये त्रिशाने बिझनेसमन वरुन मनियान यांच्याशी साखरपुडा केला.
नंतर काही दिवसांमध्येच हा साखरपुडा मोडला. याचे कारण म्हणजे धनुषमुळे हा साखरपुडा तुटला असे बोले जात आहे. शिवाय धनुषसोबतची तिची वाढती जवळीक चर्चेचा विषय बनली होती. अनेकांनी याबाबत खुलासा केला होता.
नंतर तिचे नाव सिलांबरसन टीआरशी जोडले गेले. त्यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र पुढे काय होणार हे अजून स्पष्ठ नाही. ती मल्याळम निर्मात्यासोबत लग्न करणार अशी चर्चा असली तरी त्याचे नाव आणि लग्नाची तारीख काही समोर आलेली नाही.