लोक आले, पाठीवरुन हात फिरवला अन् निघून गेले पण कोणीच…; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनाबाबत पत्नीचा मोठा खुलासा

लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीतील असे नाव आहे जे कोणीही विसरु शकत नाही. ते मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. अनेक हिट सिनेमे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले. एका आजारामुळे त्यांचे निधन झाले होते.

त्या आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना आयुष्य जगणे खुप कठीण जात होते. त्यामुळे तो संपुर्ण काळच बेर्डे कुटुंबियांसाठी कठीण होता. आता त्यावेळी नक्की काय काय घडले होते याबाबतचा खुलासा त्यांची पत्नी प्रिया बेर्डे यांनी केला आहे.

प्रिया बेर्डे याही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्या खुप वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिंधूताई माझी आई या मालिकेत त्या भूमिका साकारणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहे.

लक्ष्मीकांत जेव्हा आराजी होते, तेव्हा मला कळलं होतं की हे जे काही सुरु आहे ते ठिक नाहीये. मला ही जाणीव झाली होती की हे पर्व आता संपणार आहे. लक्ष्मीकांत हे आजारी असताना मी त्यांची माझ्या मुलासारखी काळजी घेतली होती, असे प्रिया बेर्डे यांनी म्हटले आहे.

त्यावेळी मी एकूण तीन मुलांचा सांभाळ केला होता. आईवडिल, लक्ष्मीकांत गेल्यानंतर मला खुप दु:ख झालं होतं. ते मी आता आठवलं तरी माझ्या डोळ्यातून पाणी येतं. तो काळ खुपच कठीण होता, असेही प्रिया बेर्डे यांनी म्हटले आहे.

लक्ष्मीकांत गेल्यानंतर मी खुप एकटे पडले होते. माझ्याबरोबर कोणीच नव्हतं. १३ दिवस लोक येत-जात असतात, पाठीवरुन हात फिरवत असतात आणि निघून जातात. तुमच्यासोबत कोणी नसतं. पण कोणी नसल्यामुळेच मी आज इथे पोहचलीये, असेही प्रिया बेर्डे यांनी म्हटले आहे.