---Advertisement---

Pune Cirme: पुण्यात उडाली खळबळ! मध्यरात्री थेट घरात घुसून गोळीबार, खुनाच्या थराराने परिसरात भीतीचे वातावरण…

---Advertisement---

Pune Cirme: पुण्यात काल मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या गोळीबाराच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. खडक परिसरातील सिंहगड गॅरेज चौकात ही घटना घडली आहे.

अमित साहू असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अमित साहू याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अमित साहू हा पुण्यातील खडक परिसरात राहतो. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हल्लेखोरांनी घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. यामध्ये साहू याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती होताच याठिकाणी पोलीस दाखल झाले, याबाबत अजून कारण समोर आले नाही.

दरम्यान, अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्या त्यावेळी अनिल साहूचे कुटुंबातील इतर सदस्य घरातच होते. यावेळी तीन गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर तातडीने अनिल साहू याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचे निधन झाले होते.

दुर्दैवाने अज्ञात हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांमुळे अनिल साहुचा आधीच मृत्यू झाला होता. सध्या पोलीस ही घटना का घडली आणि आरोपी कोण असेल याचा शोध घेत असून काही पथके तयार करण्यात आली आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---