Pune Crime : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तमनगरमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, गेल्या २ महिन्यांपासून या दाम्पत्यामध्ये वाद विवाद सुरू होते. अनेकदा त्यांच्यात भांडण होत होती. सोमनाथ हा त्याच्या पत्नीवर संशय घेत होता. यावरून त्यांच्यात वाद होत होते. या वादातून मारहाण देखील होत होती.
एकदा सोमनाथ आणि त्याचा भाऊ घरी दारू प्यायला बसले होते. यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. सोमनाथने पत्नीची हत्या करण्याचे ठरवले होते. यामुळे हा वाद वाढत गेला. नोव्हेंबरमध्ये सोमनाथने त्याच्या पत्नीला कॅल्शीअमच्या कॅप्सुल दिल्या.
त्याने यात आधी ब्लेडचे तुकडे टाकले आणि ते तिला खायला दिले. त्याने ते जबरदस्तीने गिळायला लावले, असा आरोप महिलेने केला आहे. यामुळे या महिलेच्या गळ्याला देखील जखमा झाल्या आहेत. याबाबत तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी आरोपी पती सोमनाथ सपकाळ (वय ४५) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फिर्यादीच्या गळ्यात जखमा झाल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत महिलेचा जीव थोडक्यात वाचला आहे. जर तिने लवकरच तक्रार केली नसती तर अशी घटना घडली नसती. मात्र सध्या तिची परिस्थिती स्थिर आहे.