---Advertisement---

Pune Crime : दुबईला बर्थडे साजरा न केल्यामुळे चिडली बायको, नवऱ्यासोबत केलं असं कृत्य की बघून पोलीसही हादरले

---Advertisement---

Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी नवऱ्याने दुबईला वाढदिवस साजरा केला नाही, तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनासारखी भेटवस्तू दिली नाही या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला.

यामध्ये पतीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील वानवडी परिसरात घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, सप्टेंबर महिन्यात रेणुकाचा वाढदिवस होता. तिला दुबईला वाढदिवस साजरा करण्याची इच्छा होती. असे असताना मात्र पती तिला दुबईला घेऊन गेला नाही, यावरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. हा वाद वाढतच गेला.

नंतर रेणुकाला डिसेंबर महिन्यात भावाच्या मुलीच्या वाढदिवसासाठी दिल्लीला जायचे होते. यावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. यातूनच रेणुकाने रागाच्या भरात पतीच्या तोंडावर ठोसा मारला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, त्यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. सप्टेंबर महिन्यात रेणुकाचा वाढदिवस होता. तिला दुबईला वाढदिवस साजरा करण्याची इच्छा होती. मात्र तसे न झाल्याने तिने हे कृत्य केले आहे. याबाबत तिने स्वतः माहिती दिली आहे.

दरम्यान, निखिल यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला होता. तसेच रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास झाल्याने निखिल यांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे मात्र पुण्यात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---