Pune News : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. यामुळे मोठी पळापळ सुरू असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पत्र्या मारुती चौक येथील सराफी दालनावर आयकर विभागाची झडाझडती सुरु आहे. हडपसर, मगरपट्टा, बाणेर या ठिकाणी देखील आयकर विभागाकडून धाडसत्र सुरु आहे. यामुळे आता अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी बडे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आयकर विभागाकडून पहाटेपासूनच ही छापेमारी सुरू आहे. छापेमारीसाठी आयकर आधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा उपलब्ध आहे. याबाबतची नाव अजून समोर आली नाहीत. मात्र यामध्ये बड्या लोकांचा समावेश आहे.
या कारवाईत आयकर विभागाचे अधिकार ४० वाहनांमधून छापासत्रासाठी दाखल झाले आहेत. यामुळे ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. दरम्यान, नीलकंठ ज्वेलर्सच्या बाणेर, हडपसर दुकानांवर छापे पडल्याची माहिती आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या कारवाईत काय हाती लागले हे अजून समोर आले नाही. मात्र ही एक मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. अतिशय दक्षता घेऊन ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारे कारवाया देखील होण्याची शक्यता आहे.