Pune Accident : पुण्यातुन अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. डंपरने दिलेल्या धडकेत ८ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुलाच्या आई समोर ही दुर्दैवी घटना घडल्याने मुलाची आई टाहो फोडून रडत होती. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील डंपर चालक गाडी रस्त्याच्या बाजूला लावून पळून गेला आहे. या भयानक घटनेमुळे संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला.
याबाबत माहिती अशी की, शौर्य सागर आव्हाळे (वय ८ वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मंतरवाडी- कात्रज रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने ॲक्टिवा गाडीला धडक दिली आहे. त्यावर असणारा लहान मुलगा शौर्य आव्हाळे हा खाली पडल्याने मुलाला डंपरने चिरडले.
यामुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलाच्या आई समोर ही दुर्दैवी घटना घडल्याने मुलाची आई टाहो फोडून रडत होती. या भयानक घटनेमुळे संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. त्यामुळे परिसरात अगीचे लोळ व मोठ्या प्रमाणात धुर पसरले होते.
ज्या ठिकाणी डंपर पेटला होता, त्याच ठिकाणी वरती लाईटच्या तारा दिसून आल्याने विज प्रवाह त्वरीत बंद करण्यात आला. मात्र तारा जळून खाक झाल्या आहेत. वीज प्रवाह बंद केल्यामुळे पुढील मोठा धोका टळला आहे. या घटनेनंतर पोलीस लगेच याठिकाणी दाखल झाले.
हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी येऊन अग्निशामक दलाची गाडी बोलावली व आग विझवण्यात आली आहे. शौर्य सागर आव्हाळे याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.